Sunday, March 5, 2017

डिप्रेशन उपचार

  वाढत्या अपेक्षा,स्पर्धा यांमूळे नैराश्य(depression ) येणे दिवसेंदिवस वाढत आहे. मानसोपचार तज्ञाकडे जाणे, Anti depressant गोळ्या खाणे हे यावरील उपचार आहेत. परंतु हा आजार आपल्या जीवनशैली किंवा आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम असू शकतो.
    त्यावरील साधेसोपे उपाय साध्या शब्दात आपण समजून घेऊ. योगासने प्राणायम दररोज करणे हा यावरील खुप महत्वाचा उपचार आहे. खरतर योग ही साधना आहे. नियमीत योग करणारे मानसिक दृष्ट्या संतुलित असतात. चल पद्धतीचे व्यायाम जसे की सायकलींग, चालणे, पोहने यामुळे antistress antidepressant हार्मोनस तयार होतात. त्यामुळे नियमीत व्यायाम करावा. आवडता एखादा छंद जपने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्याने मन आनंदीत राहत. रात्री झोपताना शास्त्रीय राग ऐकण्याने शांत झोप लागते मनावरील अनावश्यक दडपण कमी होत. आवडीचे संगीत नियमित ऐकल्यास देखील फायदा होतो. आध्यात्मिक असण किंवा अध्यात्मिक पुस्तके वाचणे, गुरूंच मार्गदर्शन घेण्याने स्वतःवरील विश्वास वाढीस लागतो. सकारात्मक पुस्तके वाचणे विचार ऐकणे याने मन सकारात्मक विचार करायला लागते. चांगले मित्र मैत्रीण बरोबर गप्पा मारणे आपले प्राॕब्लेम त्यांच्याशी शेयर करणे कधीही चांगलच. हिरवा रंग मनाला तजेला देत त्यामुळे ८-१५ दिवसात एखादा ट्रेक करणे शेतात जाणे अथवा दररोच गार्डनिंग करणे. कुत्रा मांजर यांसारखे पेट असणे आपली एकटे पणाची भावना नष्ट करते. पुष्पऔषधीमध्ये सगळेच औषधे अत्यंत उपयोगी आहेत आपण स्वतःचे स्वतः घेऊ शकतो त्याचा कुठलाही दुष्परिणाम नाही. हिरव्या भाज्या सिजनल फळे खाणे, फास्टफुड टाळल्याने पोट चांगले राहते आणि साहजिकच त्याचा फायदा मेंदूला होतो. खरतर या सर्व गोष्टी करण खुप सोप आहे पण आपण वेळेच कारण देऊन टाळत राहतो after all knowing is knowing and doing is doing. जीवनात स्पर्धा असणे गरजेचे आहे पण ती निकोप असावी. इतरांची तुलना टाळा. परिक्षा, प्रेमभंग, नोकरी, आजारपण अथवा इतर कुठल्याही कारणाने नैराश्य आल तरी वरीलप्रमाणे गोष्टी करा.जीवन सुंदर आहे आणि यांसमोर या गोष्टी शुल्लक आहेत.