Friday, January 27, 2017

Ayurveda for constipation,hyperacidity,indigestion.

आजकाल धावपळीच्या युगात पोटाच्या तक्रारींचे प्रमाणात वाढ होतेय. प्रवास,बाहेरचे खाणे,मसालेदार खाण्याने

अपचन,बद्धकोष्ठता,मुळव्याध, ऍसिडिटी , पित्त

यासारखे त्रास होतात.

आवळा ज्युस- रोज सकाळी आवळा ज्युस घेतल्याने पित्त कमी होते. आवळा क जीवनसत्वाने समृद्ध आहे.

मोरावळा- मोरावळादेखील पित्तशामक आहे. सकाळी एक चमचा घ्यावा.

त्रिफळा चुर्ण- त्रिफळा चुर्ण उत्तम विरेचक(laxative) आहे. रोज संध्याकाळी कोमट पाण्यात १-२ चमचे घेतल्याने पोट साफ राहते. अपचन, गॅसेस , पोट फुगने, जळजळ करने यावर नियमित घेतल्यास अत्यंत उपयुक्त आहे.

गंधर्व हारितकी चुर्ण- हे चुर्ण संध्याकाळी कोमट पाण्यात घेतल्यास जुनाट बद्धकोष्ठता कमी होते. ज्यांना जोर लावावा लागतो त्यांच्यासाठी उपयुक्त.

एरंडेल तेल- पोळ्यांच्या कणकेमध्ये १-२ चमचे टाकल्यास पोट साफ राहण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा १-२ चमचे कोमट पाण्यातून घेतल्यास जुलाब होऊन कोठा साफ होतो.

अविपत्तिकर चुर्ण- मळमळने, छातीत जळजळणे, घशाशी येणे, अपचन यांमध्ये उपयुक्त. सकाळ संध्याकाळ १ चमचा पाण्यात आथवा मधासोबत घेता येते.

हिंगावस्टक चुर्ण- भुक न लागणे, खाण्याची रुची जाणे, अपचन यांमध्ये गुणकारी आहे. सकाळ संध्याकाळी जेवणापुर्वी १ चमचा कोमट पाण्यातून घ्यावे.

बिल्वावलेह- रोज खाल्ल्याने पोटातील कळा मारने कमी होते. अँटीबायोटीकमूळे होणाऱ्या पोटदुखीवर प्रभावीपणे काम करते.

ओवा- पोट गच्च  होणे, गॅसेस होणे यामध्ये कोमट पाण्यात ओवा घेतल्यास त्वरित आराम मिळतो.