Hair & Ayurveda
hair fall, hair growth, graying hair,baldness
केसांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदात अनेक नैसर्गिक घटकांचा उल्लेख आहे.- मेहंदी
- जटामांसी
- आवळा
- जास्वंद
- शिकेकाई
- रिठा
- ब्राम्ही
- कोरफड
- कडूनिंब
- माका
- नागरमोथा
- बदाम
- वडाच्या पारंब्या
- भृंगराज
मेहंदी- मेहंदीमुळे केस काळे होण्यास मदत होते. मेहंदी हे उत्कृष्ट कंडीशनर म्हणून उपयुक्त आहे.
जास्वंद- जास्वंदाच्या फुलांचा वापर केस काळे होण्यासाठी तसेच घनदाट होण्यासाठी वापरू शकता.
शिकेकाई आणि रिठा- या दोन्ही वनस्पतींच्या चुर्णांचा वापर केस धुण्यासाठी करतात. याने केसातील कोंडा कमी करता येतो व केसांना चमकदार रंग येतो.
कोरफड- याचा ताजा गर डोक्याला लावण्यासाठी वापरतात. त्याने केसातील कोंडा कमी होतो,केस मऊ होतात आणि केसांची मुळे घट्ट होऊन केसांची वाढ होते. कोरफड ज्युस पिणे देखील फायदेशीर ठरते. कोरफडयुक्त तेलाचा वापरही करता येतो.
कडुनिंब- याची पाने वाटून डोक्याल लेप लावल्याने केसातील कोंडा,खरूज नायटा कमी होतो. केसातील उवांवर देखील उपयोगी .
जटामांसी- याच्या चुर्णाचा वापर चाटण म्हणून करतात. जटामांसी असणारे तेलाचा वापरही करता येतो.
बदाम-बदामातील ई जीवनसत्वामूळे केसाःना चमकदार रंग येतो व केस मजबूत होतात . बदाम बुद्धिवर्धक आहे. यातील प्रथिनांमुळे केस झपाट्याने वाढतात. बदामयुक्त तेलाचा वापर करता येतो.
वडाच्या पारंब्या- पारंब्याला येणारे नाजूक मुकूल केसवाढीसाठी अत्यंत उपयोगी आहे. वटजटादी तेलाचा वापर चाई किंवा टक्कल पडणे यावरउपयोगी आहे.
मायफळ- याच्या फळाचा वापर केस रगवण्यासाठी होतो
माका किंवा भृंगराज - याचे चुर्ण आणि तेल वापरतात. केसवाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे.
ब्राम्ही- ही बुद्धिवर्धक वनस्पती आहे. केसवाढीच्या तेलामध्ये याचा समावेश असतो. अनिद्रा ताणामूळे होणाऱ्या केसगळतीमध्ये उपयुक्त
No comments:
Post a Comment